विवाह..अनेक मापंलावून,परिमाणे लागूनही..विवाह ही आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्वाची घटना असते..ती आयुष्यभर अत्तरागत दरवळत कशी राहील यासाठी सगळेचजण खूप तरल आणि उत्कट प्रयत्न करीत असतात.पूर्वी घराच्या अंगणात मंडप घालून होत असलेली लग्ने भाडे देऊन घेतल्या जाणाऱ्या हॉल पर्यंत पोहोचली आहे..सभामंडप व लग्न हॉल जेवढा मोठा,प्रशस्त..सुखसोयीनी युक्त..तेवढा तो विवाहसोहळा वजनदार होतो असे सामाजिक भावना आहे.हा आपला अत्यंत खाजगी सोहळा देखणा..भरजरी..सगळ्यांच्या..विशेषतः समाज माध्यमांच्या नजरेत भरणारा व्हावा असे आता बऱ्याचजणांना वाटते आहे.
हवी तशी पारंपारिक सजावट..हवी तशी वातावरणनिर्मिती..एक वेगळेच हवेहवेसे जग..ही भुरळ सामान्यांना न पडती तरच नवल..आलीशान आणि शाही थाटात लग्नसोहळा करायच असेल तर यासाठी समता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित निरा संचलित समता पॅलेस व रॉयल AC हॉल ची निवड करणे योग्य राहील,आमचे हॉल आपल्या शहरापासून फार दूर नसले तरी चांगला एकांत आणि निवांतपणा तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतो.तुमच्या स्वप्नातील देखण्या विवाह सोहळ्यांसाठी सज्ज झाले आहे.आणि तेही अगदी माफक भाडेदरात घेऊन तुम्ही विवाहसभारंभ आयोजित करू शकता..,
त्यासोबतच कुटूंबातील लहान मुलांकरिता इथे चिल्ड्रन प्ले गार्डन आहे.त्यामुळे लहान मुलांची खेळण्याची चिंता मुक्त होते.प्रशस्त पार्किंग,जनसेट बॅकअप,साऊंड सिस्टीम,आवश्यक टेबल व खुर्ची,प्रोजेक्टर व स्क्रिन सोय,केटरर्स भांडी,प्रशस्त डायनिंग हॉल,संपूर्ण परीसर सी.सी. टिव्हीने सुरक्षित व सभोवतालचा निसर्गरम्य परिसर याकारणांमुळे विवाह कार्यक्रम पूर्ण एन्जॉय करु शकता.